आरोग्य केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
आरोग्य केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

आरोग्य केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना कामावर उपस्थितीबद्दल महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना हजेरीबाबत गैरशिस्त आणि वेळेत फिल्डवर न जाण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील आरोग्य केंद्रास गुरुवारी सकाळी अचानक भेट दिली. त्यांनी कर्मचारी उपस्थित व फिल्डवर गेलेले कर्मचारी, डॉक्टरांची उपस्थिती आदींचा आढावा घेतला. त्यात त्यांना दोन कर्मचाऱ्यांची गैरशिस्त लक्षात आली. त्यामुळे त्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ठाणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स यांनी वेळेत कामावर हजर राहणे अपेक्षित आहे. त्यात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. जे कर्मचारी फिल्डवर जाणे अपेक्षित आहे, त्यांनी वेळेत तिथे हजर राहावे आणि पूर्णवेळ उपलब्ध राहावे, याबाबत सगळ्यांनी दक्ष राहावे, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी दिल्या आहेत.