पालेभाज्याना महागाईची फोडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालेभाज्याना महागाईची फोडणी
पालेभाज्याना महागाईची फोडणी

पालेभाज्याना महागाईची फोडणी

sakal_logo
By

वसई, ता. ३ (बातमीदार) : शरीरातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढविण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्यांना अधिक पसंती दिली जाते, मात्र सद्यस्थितीत पालेभाज्या महागल्या असून, कोंथिबीर देखील भाव खात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घराला थेट झळ पोहचली आहे.
महागाईचे चटके सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहेत. सिलिंडरपासून ते भाज्या, तेल, इंधनाच्‍या किमती वाढल्याने जीव मेटाकुटीला आला असताना आर्थिक ताळमेळ साधणे कठीण होत आहे.
पालेभाज्यांमुळे जीवनसत्व‍व मिळते. त्यामुळे आहारतज्ज्ञ देखील रुग्णांना हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. रुग्णांना देखील याचा मोठा फायदा होतो. वसई-विरार शहरातील भाजी मंडईत पालेभाज्यांचे दर वधारले आहेत. एकीकडे अवेळी पाऊस, बदलते वातावरण याचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसत आहे. यंदा अनेक पिकांवर परिणाम झाला असून, उत्पादनाला उशीर झाला. भाज्यांची मागणी जरी अधिक असली तरी आवक मात्र घटली आहे. त्यामुळे बाजारात कोथिंबीर, पालक, शेपू, लाल माठ, मेथी जुडीचे भाव वाढले आहेत. कोथिंबीरसाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असून, रोजच्या आहारातील भाज्या महाग झाल्याने गृहिणींची आर्थिक ओढाताण होत आहे.
------------------------
एकीकडे कोरोनामध्ये रोजगार गेल्‍यामुळे घर खर्च करताना आर्थिक ओढाताण होत आहे. त्‍यात आता पालेभाज्या देखील महाग झाल्याने खायचे तरी काय, असा प्रश्न सतावत आहे.
- वनिता जाधव, गृहिणी
--------------------
उपाहारगृहांना फटका
डाळ तडका असो की अन्य भाज्या तयार करताना कोथिंबीर वापरली जाते, याचबरोबर पालकचा देखील वापर केला जातो; परंतु भाज्यांचे दर वाढल्याने उपाहारगृहांना त्‍याची झळ बसत आहे.
-------------------
कोथिंबीर - ९० रुपये
मेथी - ३० रुपये
लाल माठ - ३०
पालक - ३० रुपये
कांदा पात - २५ रुपये
शेपूभाजी - ३० रुपये