दोन ठिकाणी काम करणारा पालिका कर्मचारी बडतर्फ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन ठिकाणी काम करणारा पालिका कर्मचारी बडतर्फ
दोन ठिकाणी काम करणारा पालिका कर्मचारी बडतर्फ

दोन ठिकाणी काम करणारा पालिका कर्मचारी बडतर्फ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय आणि पार्किंग प्लाझा या दोन्ही ठिकाणी एकच कर्मचारी काम करत होता. ही बाब उघडकीस आल्यावर खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने चौकशी समिती गठित केली. या समितीने त्वरित अहवाल दिला असून संबंधित कर्मचाऱ्याला दोन्ही ठिकाणाहून बडतर्फ करण्याबरोबरच त्याचा एका ठिकाणावरचा पगार वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी हा प्रकार उघडकीस आणत याबाबत चौकशी करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठित केली; तसेच २४ तासांत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित चौकशी समितीला दिले होते. त्या समितीने या प्रकरणाची सत्यता पडताळणी करून आयुक्तांकडे अहवाल सादर केला. त्या अहवालात संबंधित कर्मचाऱ्याला दोन्ही ठिकाणाहून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन ठिकाणांपैकी एका ठिकाणावरील पगार वसूल करण्यात येईल, असेही म्हटले आहे.
...
चौकशी समितीने दिलेला अहवाल महापालिका आयुक्त यांच्याकडे सादर केला आहे. त्या अहवालात संबंधित कर्मचाऱ्याला दोन्ही ठिकाणावरून बडतर्फ करावे, असे म्हटले असून एका ठिकाणाचा पगार वसूल करण्यासंदर्भातही नमूद केले आहे.
- मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे पालिका