महाराष्ट्र चेंबरला एम.एस.एम.ई. मंत्रालयाचे सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र चेंबरला एम.एस.एम.ई. मंत्रालयाचे सहकार्य
महाराष्ट्र चेंबरला एम.एस.एम.ई. मंत्रालयाचे सहकार्य

महाराष्ट्र चेंबरला एम.एस.एम.ई. मंत्रालयाचे सहकार्य

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. ३ : महाराष्ट्रातील युवकांना व महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व केंद्र सरकारच्या एम.एस.एम.ई मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोहीम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाने एम.एस.एम.ई खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन यासंबंधीची संकल्पना मांडली. त्यास राणे यांनी मान्यता दिली. महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक वालचंद हिराचंद यांच्या २३ नोव्हेंबर या जयंती दिनापासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे.

राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ७५ ठिकाणी या अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. व्यापार उद्योगातील नवीन संधी, त्यासाठी असलेल्या सरकारच्या योजना, अर्थ पुरवठ्यासाठीच्या योजना, केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाच्या योजना, व्यापार उद्योगासाठी लागणारे प्रशिक्षण यासंबंधीची माहिती या मोहिमेतून देण्यात येईल. तसेच या अंतर्गत उद्योग आधार योजनेखाली राज्यातील व्यापारी, उद्योगांची नोंदणीही केली जाईल, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून किमान दहा हजार युवक व महिला, नवीन व्यापार उद्योग सुरू करतील अशा प्रकारचे हे आयोजन केले आहे. महाराष्ट्र चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्ष संगीता पाटील, युथ विंगचे चेअरमन संदीप भंडारी, एम. एस. एम. ई. कमिटीचे चेअरमन आशीष नहार व अन्य पदाधिकारी या मोहिमेत सहभागी होतील. २३ नोव्हेंबर ते १५ मार्च या कालावधीत राज्यभरातील ५० हजार युवक व महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट चेंबरने ठेवले आहे.