कर्करोगग्रस्त रुग्णांना अन्नदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोगग्रस्त रुग्णांना अन्नदान
कर्करोगग्रस्त रुग्णांना अन्नदान

कर्करोगग्रस्त रुग्णांना अन्नदान

sakal_logo
By

शिवडी, ता. ३ (बातमीदार) ः आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आठवड्यातून दोन दिवस परळ पूर्व येथील के. ई. एम रुग्णालय, टाटा रुग्णालय येथील कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना, तसेच गरजू रुग्णांना मोफत अन्नदान व फळांचे वाटप करण्यात येते. गुरुवारी (ता. ३) रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. यात सहाय्यक पोलिस आयुक्त कल्पना गाडेकर यांनी सहभाग नोंदवून अन्नदान केले. या वेळी असोसिएशनचे समीर परब यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.