दिघा परिसरात भरदिवसा घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिघा परिसरात भरदिवसा घरफोडी
दिघा परिसरात भरदिवसा घरफोडी

दिघा परिसरात भरदिवसा घरफोडी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.३ (वार्ताहर): अज्ञात चोरट्याने दिघा कृष्णवाडी भागातील गोकुळ अपार्टमेंट इमारतीत भरदिवसा अवघ्या तासाभरात घरफोडी करुन दागिने व रोख रक्कमेसह तब्बल सव्वा चार लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
दिघा येथील कृष्णवाडी भागातील हिंदमाता शाळेजवळ गोकुळ अपार्टमेंटमध्ये दपर्ण गुंड (३५) हे कुटुंबासह राहण्यास आहेत. गत ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी दर्पण गुंड हे आपल्या कामावर निघुन गेल्यानंतर दुपारी ३ वाजता दर्पण गुंड यांची पत्नी व मुलगी या दोघी घराला टाळे लावुन ठाणे येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. यादरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधुन गुंड यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरातील १ लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा सुमारे सव्वा चार लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास गुंड यांच्या शेजाऱ्यांना त्यांचे घर उघडे असल्याचे व कडी कोयंडा तुटल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दर्पण गुंड यांच्या पत्नीला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घरी धाव घेऊन पहाणी केली असता, त्यांच्या घरातील सर्व दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.