दीपावली अंक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपावली अंक
दीपावली अंक

दीपावली अंक

sakal_logo
By

गेली ४५ वर्षे वैविध्यपूर्ण दर्जेदार मजकूर देणाऱ्या ‘दीपावली’ अंकाने याही वर्षी आपल्या परंपरेला जागत वाचकांना साहित्य फराळाची मेजवानी दिली आहे. विवेक गोविलकर यांची दीर्घकथा, मिलिंद बोकीळ, गणेश मतकरी, किरण येले, नीरजा, लक्ष्मीकांत देशमुख, असिफ चाफळकर यांच्यासारख्या नामवंत कथाकारांच्या कथा, विश्वास पाटील, सुबोध जावडेकर, नंदिनी आत्मसिद्ध, अमरीश मिश्र, डॉ. शरद वरदे आदींचे ललित लेख या अंकात वाचायला मिळतात. ‘उज्ज्वल भविष्यासाठी नवनिर्मिती’ या नावाखाली एक लेखमाला छापण्यात आली असून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. बाळ कोंडके अशी या क्षेत्रातील नामवंत लेखक मंडळी विभागात वाचायला मिळतात. कवितेच्या विभागात दर वर्षीप्रमाणे यंदाही मराठीतील नामवंत कवींची मादियाळी जमविण्यात आली आहे. वसंत आबाजी डहाके, हेमंत गोविंद जोगळेकर, उत्तम कोळगावकर, नारायण कुलकर्णी कवठेकर, महेश केळुस्कर, संजय कृष्णाजी पाटील, प्रज्ञा दया पवार, प्रवीण दशरथ बांदेकर इ. कवींच्या कविता समाविष्ट आहेत.

संपादक अशोक कोठावळे
पृष्ठे २४०, किंमत ३०० रुपये.