लोअर परळ येथे रक्तदान उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोअर परळ येथे रक्तदान उत्सव
लोअर परळ येथे रक्तदान उत्सव

लोअर परळ येथे रक्तदान उत्सव

sakal_logo
By

मुंबई ः ‘बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ’ व ‘शिवशाहू प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी नायर हॉस्पिटल, के.ई.एम. हॉस्पिटल व वाडिया हॉस्पिटल यांच्या विनंतीला मान देत रक्तदान उत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत लोअर परळ, पूर्व येथील ना. म. जोशी म्युनिसिपल शाळा, पहिला मजला व तळ मजला सभागृह डिलाईल रोड येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्‍या हजार रक्तदात्यांना भेट स्वरूपात वर्तमानपत्राचे महत्त्‍व असणणारे टी-शर्ट, बॅग व वॉटर बॉटल अशा तीन वस्तू देण्यात येतील. या सामाजिक उपक्रमामध्‍ये लोकशांती को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष विलास पाटील, तिरुपती को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष नीलेश मानकर व महावीर इंटरनॅशनल ट्रस्ट मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दरम्‍यान, यावर्षी १५०० रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प केला असल्‍याचे संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांनी सांगितले आहे.