कळंबोलीजवळ वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबोलीजवळ वाहतूक कोंडी
कळंबोलीजवळ वाहतूक कोंडी

कळंबोलीजवळ वाहतूक कोंडी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ ः सायन-पनवेल महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कळंबोली उड्डाणपुलावर कॉँक्रीटीकरणाच्या कामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील वाहतूक आजपासून बंद केल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. मुंबई आणि पुणे दोन्ही बाजूला जाणाऱ्या मार्गिकांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण सायन-पनवेल महामार्गाचे काँक्रीटीकरण केले आहे; परंतु मार्गावरील उड्डाणपुलांवरील काही भाग अद्याप डांबराचा आहे. पावसाळ्यात हा डांबराचा भाग उखडून मोठे खड्डे पडतात. रस्त्याची अक्षरशः चाळण होते. त्यावर पर्याय म्हणून उड्डाणपुलावरील डांबराचा भाग काढून त्या जागेवर काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. कळंबोली येथील उड्डाणपुलावर काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आजपासून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तसेच उड्डाणपुलाखालील भुयारी मार्गही बंद केला आहे. काल रात्रीनंतर पोलिसांनी महामार्ग बंद केल्यावर दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच कळंबोली नोड, जवाहर औद्योगिक वसाहत आणि कामोठेकडे जाण्यासाठी पर्यायी सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
...
आठवड्याची सुट्टी वाहतूक कोंडीची
शनिवार आणि रविवार अशा आठवड्याच्या या दोन्ही दिवशी मोठ्या प्रमाणात मुंबईकर पुणे, लोणावळा, अलिबाग आणि कोकणात फार्महाऊस व पिकनिकला जात असतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढते; तर सोमवारी सगळे पुन्हा कामावर येण्यासाठी रविवारी रात्रीच मुंबईकडे रवाना होतात. अशा परिस्थितीत कळंबोलीचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाहतूक पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.