चार कोटींचे विदेशी चलन मुंबई विमानतळावर जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार कोटींचे विदेशी चलन 
मुंबई विमानतळावर जप्त
चार कोटींचे विदेशी चलन मुंबई विमानतळावर जप्त

चार कोटींचे विदेशी चलन मुंबई विमानतळावर जप्त

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत ४.९७ लाख अमेरिकन डॉलर्स किमतीचे विदेशी चलन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या चलनाची भारतीय रुपयांमधील किंमत सुमारे ४.१ कोटी इतकी आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई एअर इंटेलिजन्स युनिटकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क विभागाने दुबईला जाणाऱ्या तीन भारतीय प्रवाशांना रोखले. या वेळी स्कॅनरमध्ये त्यांच्या बॅगेत काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. बॅग उघडली असता त्यात अमेरिकन चलनाच्या नोटा आढळून आल्या. या नोटा साड्यांमध्ये तसेच बुटांमध्ये लपवून देशाबाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानुसार सीमा शुल्क विभागाने ४ लाख ९७ हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे ४.१ कोटी मूल्यांच्या नोटा ताब्यात घेण्यात आल्या. सध्या आरोपींची चौकशी सुरू असून त्यांनी या अमेरिकी चलनाच्या नोटा कुठून आणल्या आणि ते कुठे नेणार होते, याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.