मुलुंडमध्ये ‘बेताल झाले सूर’ कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये ‘बेताल झाले सूर’ कार्यक्रम
मुलुंडमध्ये ‘बेताल झाले सूर’ कार्यक्रम

मुलुंडमध्ये ‘बेताल झाले सूर’ कार्यक्रम

sakal_logo
By

मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघाचे माजी विश्वस्त आणि अध्यक्ष सु. ल. गद्रे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला जातो. याच अनुषंगाने यावर्षी देखील एका सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात गुरफटलेल्यांना चार घटका विरंगुळा म्हणून आणि निखळ करमणुकीचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘बेताल झाले सूर’ हा कार्यक्रम बुधवारी (१६ नोव्हेंबर) सेवा संघाच्या सु. ल. गद्रे सभागृहामध्ये संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे संगीत आयोजन किशोर देशमुख करणार असून संवादक म्हणून चंद्रशेखर वझे आणि डॉ. वृषाली देशमुख उपस्थित राहणार आहेत. हा सांगीतिक कार्यक्रम मोफत असून सर्व रसिक प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.