चित्रपटात काम देतो सांगून फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रपटात काम देतो सांगून फसवणूक
चित्रपटात काम देतो सांगून फसवणूक

चित्रपटात काम देतो सांगून फसवणूक

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) ः चित्रपटांच्या शूटिंगच्या ठिकाणी काम देण्याच्या भूलथापा देऊन एका तरुणाने उल्हासनगरातील शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आज सायंकाळी सहायक पोलिस आयुक्तांकडे धाव घेऊन फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली गाऱ्हाणी मांडली. फसवणूक करणाऱ्या तरुणाने एका मुलाला आपल्यासोबत जयपूर, राजस्थान अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिथे शूटिंग होणार असल्याचे सांगितले. या कामासाठी अजून मुलांचा ग्रुप बनवावा लागेल, असेदेखील सांगितले. ग्रुप तयार होताच त्या तरुणाने सर्व मुलांकडून वेगवेगळ्या कारणाने टप्प्याटप्प्याने पैसे गोळा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली; तसेच सहायक पोलिस आयुक्तांची भेट घेतली.