मध्य रेल्वेची महसूलामध्ये भरारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेची महसूलामध्ये भरारी!
मध्य रेल्वेची महसूलामध्ये भरारी!

मध्य रेल्वेची महसूलामध्ये भरारी!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत भाडे-व्यतिरिक्त (नॉन-फेअर) महसुलात ३९.४५ कोटी आणि पार्सल महसुलात १५०.८७ कोटींची विक्रमी कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसुलासह २२४ टक्क्यांची प्रभावी वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते ऑक्टोबर) मध्ये ३.०१ लाख टन पार्सल आणि सामानाच्या वाहतुकीद्वारे १५०.८७ कोटींचा महसूल गोळा केला. त्यापैकी ऑक्टोबरमध्ये २१.७२ कोटींची नोंदणी झाली. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये (ऑक्टोबरपर्यंत) वेळापत्रकानुसार पार्सल गाडीच्या १५० फेऱ्यांत १०.७५ कोटी महसूल मिळवले आणि २० इंडेंट पार्सल कार्गो एक्सप्रेस गाडीने ४.१० कोटी महसूल मिळवला. सध्या ९३ सामान्य द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन आणि १५ पार्सल व्हॅन भाडेतत्त्वावर आहेत. त्यापैकी २६ लगेज व्हॅन आणि एक पार्सल व्हॅन अलीकडेच ई-लिलावाद्वारे भाड्याने देण्यात आल्या आहेत; तर भाडे-व्यतिरिक्त महसूलमध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये (एप्रिल ते ऑक्टोबर) मध्य रेल्वेची कामगिरी गतवर्षीच्या याच कालावधीतील १२.१६ कोटीच्या तुलनेत ३९.४५ कोटींचे अधिक उत्पन्न मिळाले आहे.

फायद्याचे करार
ऑक्टोबर २०२२ मध्ये केलेले प्रमुख करार बाह्य विनाइल रॅपिंगसाठी पुणे विभागाकडून २ गाड्या असलेले करार ३ वर्षांसाठी असून त्याद्वारे वार्षिक २५.०७ लाख महसूल मिळेल. अंतर्गत जाहिरातीसाठी पुणे विभागाकडून एका गाडीचा करार ३ वर्षांसाठी असून वार्षिक २.०२ लाख महसूल मिळेल. नागपूर विभागाकडून अजनी-अमरावती एक्स्प्रेसमध्ये अंतर्गत जाहिरातींचा समावेश असलेला करार ३ वर्षांसाठी वार्षिक ३.९४ लाख महसूल मिळेल. १० रेल डिस्प्ले नेटवर्क ८३.७८ लाख वार्षिक महसुलासह ई-लिलावाद्वारे करार करण्यात आले.