४६ लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला बिहारमधून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

४६ लाखांच्या मुद्देमालासह 
आरोपीला बिहारमधून अटक
४६ लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला बिहारमधून अटक

४६ लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला बिहारमधून अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : मालकाच्या घरी १२ वर्षे हाऊस कीपिंग मॅनेजर म्हणून काम करून नंतर त्याच घरात चोरी करणाऱ्या चोरट्याला कांदिवली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुद्देमालासह बिहारच्या जमुई जिल्ह्यातून अटक केली. आरोपींकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ४६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २६ ऑक्टोबरला कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रारदाराच्या घरातून ४१ लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार आली होती. त्यानंतर कांदिवली पोलिसांच्या तपासात आरोपी बिहारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जमुई जिल्ह्यातून ३४ वर्षीय आरोपी श्रीकांत चिंतामणी यादवला अटक केली.