गरोदर महिलेचा वाटेतच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरोदर महिलेचा वाटेतच मृत्यू
गरोदर महिलेचा वाटेतच मृत्यू

गरोदर महिलेचा वाटेतच मृत्यू

sakal_logo
By

मुरबाड, ता. ५ (बातमीदार) : शहरातील मुख्य बाजारपेठेतून ग्रामीण रुग्णालयात जाणारा सार्वजनिक रस्ता लोखंडी रॉड लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दवाखाना बंद असल्याचा समज होऊन आदिवासी गरोदर महिलेला खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी जाण्याची वेळ आली. पुढील उपचारांसाठी तिला कळवा येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुरबाड ग्रामीण रुग्णालयात जाणारा सार्वजनिक रस्ता बंद करणाऱ्यावर कारवाई करावी व सदर रस्ता विद्रूप केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात यावा, अशी मागणी आरपीआय (सेक्युलर) मुरबाड शहर अध्यक्ष धनंजय थोरात यांनी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक, तहसीलदार मुरबाड व सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड यच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. मुरबाड शहरातील मुख्य रस्त्यावरून पंचायत समिती कार्यालयमार्गे ग्रामीण रुग्णालय व तेथून पुढे म्हसा रस्त्याकडे जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरी रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावरून पूर्वापार वाहने जात होती; मात्र मुरबाड ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुखांनी बुधवारपासून तेथे लोखंडी रॉड लावून वाहन वाहतुकीसाठी रस्ता बंद केला आहे. त्यामुळे आजारी रुग्णांची गैरसोय होत असल्याने ते रॉड काढून टाकण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती व हा रस्ता खुला न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.