दिवाळी अंक ‘मार्मिक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी अंक ‘मार्मिक’
दिवाळी अंक ‘मार्मिक’

दिवाळी अंक ‘मार्मिक’

sakal_logo
By

दिवाळी अंक ‘मार्मिक’

‘मार्मिक’ या दिवाळी अंकाचे यंदाचे ६२ वे वर्ष. राजकीय घडामोडींवर आपल्या व्यंगचित्रातून चिमटे काढण्यासाठी ‘मार्मिक’ हे प्रसिद्ध आहे. अंकाची सुरुवात ‘पितृतुल्य साहेब’ या लेखाने होते, या लेखात प्रभाकर वाईरकर यांनी गेली पस्तीस-चाळीस वर्षांच्या व्यंगचित्र कारकिर्दीतील त्यांचे अनुभव मांडले आहेत. यामध्ये ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देतात. ‘सेम्पे आनंदाचा व्यंगचित्रकार’ हा सुरेश लोटलीकर यांचा लेख व्यंगचित्रकारितेबद्दल माहिती देणारा आहे. प्रकाश अकोलकरांचा ‘बातमीदारीचा अड्डा’हा लेख पत्रकारितेतील अनुभव सांगणारा ठरतो. ‘नियतीचा फेरा’हा घनश्याम भडेकर यांचा लेख वाचकांना खिळवून ठेवतो. अंकातील व्यंगचित्र सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलकी ठरतात. राजेश कोळंबकर यांचा ‘चील चील चिल्ला के’ हा बबलू आणि बाबाचा संवाद हा लेख दोन पिढ्यांमधील भाष्य करणारा असा मनाला भावून जातो. पेट पुराण, दिवाळीची जत्रा, मुकेशरावांच्या माणुसकीची गोष्ट, माझी साक्षत्कारी पाठदुखी, चला, सजग खवय्ये बनू!, दीपावली वार्षिक भविष्य अशा विविध पैलूंनी हा अंक व्यापलेला आहे. सोबतच अंकाची मांडणी आणि सजावट आकर्षक स्वरूपाची करण्यात आली आहे. एकदंरित ‘मार्मिक’चा यंदाचा हा दिवाळी अंक वाचकांसाठी परिपूर्ण मेजवानी ठरतो.

संपादक : उद्धव बाळासाहेब ठाकरे
पृष्ठे : १३०
मूल्य : १००