ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या
ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या

ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : एकनाथ शिंदे यांचे सरकार राज्याच्या इतिहासातील सर्वात गतिमान सरकार असून, या सरकारने माझ्या आयुष्याच्या अखेरीस मराठा समाजाला त्वरेने ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांनी केली. पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बिनव्याजी कर्ज व सारथी संस्थेमार्फत निर्वाह भत्ता देण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दलही पवार यांनी आभार मानले. जवळपास सात-आठ वर्षांनी राज्याला मराठा मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यामुळेच समाजातील तरुणांसाठी सकारात्मक निर्णय होत आहेत. शिंदे यांनी आता मराठा समाजाला त्वरेने ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणीही पूर्ण करावी, याच मार्गाने मराठा समाजाला त्वरेने आरक्षण मिळू शकेल, अन्यथा मराठा समाजाची ही मागणी न्यायालयीन प्रक्रियेत बराच काळ प्रलंबित राहील, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.