देखभाल-दुरुस्तीसाठी उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देखभाल-दुरुस्तीसाठी उद्या 
तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
देखभाल-दुरुस्तीसाठी उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

देखभाल-दुरुस्तीसाठी उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची देखभाल-दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ६) तिन्ही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते भाईंदर अप-डाऊन धीम्या मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असणार आहे.
......
मध्य रेल्वे
कुठे ः सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी ः सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे पुन्हा धीम्या मार्गावर वळवल्या जातील; तर घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप-धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
---
हार्बर रेल्वे
कुठे ः पनवेल- वाशी अप आणि डाऊन
कधी ः सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉकदरम्यान पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप मार्गावरील आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन सेवा बंद राहतील. पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवाही बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
----
पश्चिम रेल्वे
कुठे ः बोरिवली ते भाईंदर अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी ः रात्री १२.३५ ते पहाटे ४.३५ वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक नसेल.