मनसेच्या पनवेल उपशहर अध्यक्षाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेच्या पनवेल उपशहर अध्यक्षाला मारहाण
मनसेच्या पनवेल उपशहर अध्यक्षाला मारहाण

मनसेच्या पनवेल उपशहर अध्यक्षाला मारहाण

sakal_logo
By

पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : मनसेचे पनवेल उपशहर अध्यक्ष मनोज कोठारी यांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत मनोज कोठारी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामोठे पोलिसांनी या प्रकरणात मिलिंद खाडे व त्याच्या तीन सहकाऱ्यांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मनोज कोठारी हे कामोठे परिसरात राहण्यास असून त्यांचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. कोठारी यांना तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल उपशहर अध्यक्षपद मिळाले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ते आपल्या मित्रांसह बी. के. धाबा येथे गाडीने गेले होते. त्या ठिकाणी मिलिंद खाडे हा त्याच्या तीन मित्रांसह गप्पा मारत उभा होता. या वेळी त्यांनी कोठारी यांच्याकडे विचारपूस केल्यावर मिलिंद हा त्यांच्या अंगावर धावून गेला. या वेळी कोठारींचा मित्र प्रशांत धनावडे याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, मिलिंद खाडे व त्याच्या तीन मित्रांनी गाडीमधील हॉकीस्टिक काढून मनोज कोठारी व प्रशांत धनावडे यांना मारहाण केली. त्यानंतर चौघांनी पलायन केले.