सीएनजीचे दर नव्वदीजवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएनजीचे दर नव्वदीजवळ
सीएनजीचे दर नव्वदीजवळ

सीएनजीचे दर नव्वदीजवळ

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : महानगर गॅसने वाहनांसाठीच्या सीएनजीच्या दरात प्रतिकिलो साडेतीन रुपये वाढ केली असून, स्वयंपाकाच्या पीएनजीच्या दरात प्रतिघनमीटरमागे दीड रुपये वाढ केली आहे. त्यामुळे शनिवार (ता. ५) पहाटेपासून सीएनजीची किंमत प्रतिकिलोमागे ८९.५० रुपये झाले आहेत; तर पीएनजीची किंमत प्रतिघनमीटर मागे ५४ रुपये झाली आहे. देशात उत्पादित होणाऱ्या गॅसच्या किमतीत १ ऑक्टोबरला ४० टक्के वाढ झाली आहे. तसेच महानगर गॅसला पुरवण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायूचा पुरवठाही १० टक्के कमी झाला आहे. त्यामुळे महानगर गॅसला बाजारातून जास्त किमतीचा नैसर्गिक वायू विकत घ्यावा लागतो. त्यातच रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे महानगर गॅसला नैसर्गिक वायूसाठी जास्त रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे नैसर्गिक वायूचे दर वाढवणे अत्यावश्यक आहे, असे महानगर गॅसने म्हटले आहे.