अविनाश भोसले यांना कोरोनाची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अविनाश भोसले यांना कोरोनाची लागण
अविनाश भोसले यांना कोरोनाची लागण

अविनाश भोसले यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : मनी लॉण्डरिंगप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले उद्योगपती अविनाश भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारांसाठी गुरुवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार भोसले यांना दहा दिवसांआधी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या वेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. भोसले यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसले यांना यापूर्वी सीबीआय आणि त्यानंतर ईडीने अटक केली.