आदित्य ठाकरेंच्या गडात युवा वॉरियर्स शाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरेंच्या गडात युवा वॉरियर्स शाखा
आदित्य ठाकरेंच्या गडात युवा वॉरियर्स शाखा

आदित्य ठाकरेंच्या गडात युवा वॉरियर्स शाखा

sakal_logo
By

मालाड, ता. ५ (बातमीदार) ः भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्य यांच्या हस्ते वरळी या आदित्‍य ठाकरे यांच्‍या गडात युवा वॉरियर्स शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीच्‍या दृष्‍टीने या युवा वॉरियर्स शाखेला महत्त्‍व आल्‍याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या युवा कार्यकर्त्यांनी विमानतळावर तेजस्वी सूर्या यांचे जल्लोषात स्वागत केले. त्‍यानंतर तेजस्वी सूर्याजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मुंबादेवीला अभिवादन केले. मुंबईतील त्यांच्या एकदिवसीय प्रवासादरम्यान, तेजस्वी सूर्या यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचा बालेकिल्ला आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघ असलेल्‍या वरळीत भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या युवा वॉरियर्स शाखेचे उद्‌घाटनही केले. याप्रसंगी सामाजिक क्षेत्राशी निगडित अनेक युवकांनी युवा वॉरियर्स बनण्याची शपथ घेतली.
या वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, महाराष्ट्र व मुंबई युवा मोर्चा प्रभारी गौरव गौतम, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य वसुलीची गाडी म्हणून काम करत असून त्यांनी केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. भाजप आणि महायुती सरकार जनादेशाचे पालन करत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक कुशल आणि विकसनशील सरकार देण्याचं काम करत आहे.
- तेजस्वी सूर्या, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा