तडीपार आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तडीपार आरोपीला अटक
तडीपार आरोपीला अटक

तडीपार आरोपीला अटक

sakal_logo
By

ठाणे, ता. ५ (वार्ताहर) : ठाणे पोलिसांनी दोन वर्षांकरीता आरोपी राहुल भालेराव (वय २४) याला ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड जिल्ह्यातील कर्जत व पनवेल या तालुक्यातील महसूल हद्दीतून तडीपार केले होते. तरीही तो परिसरात वास्तव्य करीत होता. यामुळे गुरुवारी राहुल भालेराव वागळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपी राहुल भालेराव याला ठाणे पोलिस उपायुक्तांनी २६ मार्च २०२२ रोजी २ वर्षांकारीता ४ जिल्ह्यातून तडीपार केले होते. आरोपीने पोलिसांचा मनाई आदेश धुडकावून अंबीकानगर, वागळे इस्टेट, ठाणे येथे वास्तव्य करताना पोलिसांना आढळला. आरोपीकडे एक स्टीलची तलवार आढळून आली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.