मालवणीत दागिन्‍यांसह सिलिंडरवर चोरांचा डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणीत दागिन्‍यांसह सिलिंडरवर चोरांचा डल्ला
मालवणीत दागिन्‍यांसह सिलिंडरवर चोरांचा डल्ला

मालवणीत दागिन्‍यांसह सिलिंडरवर चोरांचा डल्ला

sakal_logo
By

मालाड, ता. ५ (बातमीदार) ः मालवणीतील जुने कलेक्टर कंपाऊंडच्‍या गेट क्रमांक पाच येथील घरात चोरीची घटना घडली. मलिक शफिक हबीब कुरेशी हे आपल्या कुटुंबीयांसह काही दिवसांसाठी गावी गेले आहेत. त्यांच्या घराचे टाळे तोडत ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चोरांनी घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने तसेच सिलिंडर घेऊन पसार झाले असल्याची माहिती कुरेशी यांचे लहान भाऊ यांनी दिली आहे. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
दरम्‍यान, याआधी मालवणी क्रमांक तीन, गुजराती चाळ, एकता चाळ, अली तलाव तसेच जुने आणि नवीन कलेक्टर कंपाऊंडमध्ये अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे; तर नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही बसवण्याची गरज व्‍यक्‍त होत आहे.