लोकल मधील फुकट्या प्रवाश्याची संख्येत वाढ .... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकल मधील फुकट्या प्रवाश्याची संख्येत वाढ ....
लोकल मधील फुकट्या प्रवाश्याची संख्येत वाढ ....

लोकल मधील फुकट्या प्रवाश्याची संख्येत वाढ ....

sakal_logo
By

कल्याण, ता. ६ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वेस्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असताना विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली असून अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.
कोरोना काळ आणि लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध निर्बंध होते; मात्र आता सर्व नियम शिथिल केल्याने मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वेस्थानकात लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. यामुळे रेल्वेच्या तिजोरीत महसूल वाढत असताना विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. अशा फुकट्या प्रवाशांना रेल्वेने चांगला दणका दिला असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा रेल्वेस्थानकातील कल्याण, अंबरनाथ, कसारा आणि शहाड या रेल्वेस्थानकामधून सर्वात जास्त प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे कारवाईवरून उघड झाले आहे.


एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान कारवाई

रेल्वे स्थानक विनातिकीट प्रवास दंडाची रक्कम
कल्याण रेल्वेस्थानक २६०९७ ६३,६९,१४७ रुपये
शहाड रेल्वेस्थानक ६१०३ १३, ३९, ७४३ रुपये
आंबिवली रेल्वेस्थानक ५२९५ १५, १७, ६८७ रुपये
टिटवाळा रेल्वेस्थानक २४२७ ६, २१, ५३६ रुपये
आसनगाव रेल्वेस्थानक १०९१ २, ४८, १२२ रुपये
कसारा रेल्वेस्थानक १२८६ ३, ७९, ७७३ रुपये


....................
केवळ सकाळी १० ते सायंकाळी ५ या काळात तिकीट तपासणी न करता २४ तास तिकीट तपासणी करण्याची मागणी कल्याण-कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. ही कारवाई झाली तरच विनातिकीट प्रवासी कमी होतील.
- श्याम उबाळे, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव