महावितरणच्या भरारी पथकाकडून 122 ग्राहकांवर 33 लाखाची वीज चोरीची धडक कारवाई... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या भरारी पथकाकडून 122  ग्राहकांवर 33 लाखाची वीज चोरीची धडक कारवाई...
महावितरणच्या भरारी पथकाकडून 122 ग्राहकांवर 33 लाखाची वीज चोरीची धडक कारवाई...

महावितरणच्या भरारी पथकाकडून 122 ग्राहकांवर 33 लाखाची वीज चोरीची धडक कारवाई...

sakal_logo
By

शहापूर, ता. ५ (बातमीदार) ः शहापूर तालुक्यात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये तालुक्यातील अनेक गावांतील घरगुती व वाणिज्य अशा १२२ ग्राहकांवर महावितरणच्या भरारी पथकाकडून वीजचोरीची धडक कारवाई करण्यात आली आहे. यात सुमारे ३३ लाखांची चोरी केलेल्या विजेचे बिल अदा करण्यात आले आहे.
तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून वीज चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून महावितरणच्या भरारी पथकाने ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील २१ गावांतील वीजग्राहकांच्या जोडणीची तपासणी केली. यावेळी संबंधित ठिकाणी एक लाख ८६ हजार १७२ युनिट्सची वीजचोरी आढळून आली.
यामध्ये एकूण १२२ वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करून एकूण ३२ लाख ९६ हजार ६५५ रुपये इतक्या रकमेची चोरी पकडण्यात आली आहे. तसेच काही ग्राहकांनी वीजचोरीची बिले अदा केल्यानंतरही ज्या ग्राहकांनी वीजबिले भरली नाहीत अशा ग्राहकांवर पोलिस ठाणे मुरबाड येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

..............................
बंद केलेला विद्युत पुरवठा स्वतः करणाऱ्या ग्राहकांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येतील याची नोंद घ्यावी. तसेच विनामीटर विद्युत वाहिनीवरून थेट विद्युत पुरवठा घेतल्यास महावितरणकडून संबंधित विभागप्रमुख किंवा प्रकल्प प्रमुख यांच्या विरोधातही कारवाई करण्यात येईल. त्यामुळे वीजग्राहकांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा.
- अविनाश कटकवार, उपकार्यकारी अभियंता, शहापूर महावितरण उपविभाग.