भाताला प्रतिक्विंटल २ हजार ४० रुपये भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाताला प्रतिक्विंटल २ हजार ४० रुपये भाव
भाताला प्रतिक्विंटल २ हजार ४० रुपये भाव

भाताला प्रतिक्विंटल २ हजार ४० रुपये भाव

sakal_logo
By

जव्हार, ता. ५ (बातमीदार) : यंदा महामंडळाकडून प्रतिक्विंटल २ हजार ४० रुपये एवढा भाव दिला आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी महामंडळाच्या खरेदी केंद्रावर आपले धान्य द्यावे, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक आमदार भुसारा यांनी यावेळी केले. तसेच हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार असल्याने पारदर्शक कारभाराचा आधार घ्यावा, असेही यावेळी भुसारा यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून होणाऱ्या आधारभूत खरेदी केंद्राचे उद्‌घाटन आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते जव्हार आणि मोखाडा येथे झाले. यावेळी ते बोलत होते.
मागील सरकारच्या काळात आम्ही महामंडळाच्या केंद्रावर धान्य देणाऱ्या शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे अनुदान दिले होते. आताची वाढलेली महागाई पाहता यंदा अनुदान म्हणून १ हजार रुपये द्यावे, अशी मागणी भुसारा यांनी केली. तसेच या आधारभूत खरेदीमध्ये १ क्विंटलपेक्षा जास्त धान्यच खरेदी करता येते, यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची अडचण होते. यासाठी एकाधिकार खरेदी योजनाही सुरू करावी, अशी मागणी यावेळी सरकारकडे भुसारा यांनी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख, प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, उपप्रादेशिक व्यवस्थापक राजेश पवार, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर वाडा, विक्रमगड, जव्हार या भागातही आधारभूत खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. तसेच या भागात पिकांचे नुकसान कमी झालेले असले तरी शासनाने पंचनामे करून ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी भुसारा यांनी केली आहे.