मोरबीच्या अपघातातील मृतांना श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरबीच्या अपघातातील मृतांना श्रद्धांजली
मोरबीच्या अपघातातील मृतांना श्रद्धांजली

मोरबीच्या अपघातातील मृतांना श्रद्धांजली

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः गुजरातमधील मोरबी दुर्घटनेतील मृतांना आत्मसन्मान मंचतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी पोस्टर लावण्यात आले होते. या वेळी उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहिली. ‘गुजरातच्या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशात अश्रूंचा महापूर आला आहे. या दु:खद घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,’ असे ‘आत्मसन्मान मंच’चे अध्यक्ष नित्यानंद शर्मा यांनी म्हटले आहे. यावेळी सचिव प्रभात दुबे, दिव्या भानुशाली, भारत कविरत्न, अरविंद शुक्ला, संजय ठाकूर, नितेश निसाद आदींसह स्थानिक लोकांचा सहभाग होता.