यंदाच्या ‘मॅरेथॉन स्पर्धे`चा मार्ग पूर्वपट्टीतून न्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदाच्या ‘मॅरेथॉन स्पर्धे`चा मार्ग पूर्वपट्टीतून न्यावा
यंदाच्या ‘मॅरेथॉन स्पर्धे`चा मार्ग पूर्वपट्टीतून न्यावा

यंदाच्या ‘मॅरेथॉन स्पर्धे`चा मार्ग पूर्वपट्टीतून न्यावा

sakal_logo
By

विरार, ता. ५ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचा नियोजित मार्ग मागील नऊ वर्षांत पश्चिम पट्ट्यातूनच जात आहे. या स्पर्धा आयोजनात वसई-विरार पूर्वपट्टीचा विचार केला जात नसल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांत अन्यायाची भावना आहे. त्यामुळे यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग पूर्वपट्टीतून नेऊन जनभावनांचा आदर राखला जावा, अशी मागणी वसई शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
या मागणीनंतरही वसई-विरार महापालिकेने न्यायिक भूमिका घेतली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन शिवसेना नालासोपारा विधानसभा उपजिल्हाप्रमुख स्वप्नील बांदेकर, शहरप्रमुख संतोष टेंबवलकर, उत्तम तावडे, जितू शिंदे व भरत देवघरे यांच्या उपस्थित महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांना देण्यात आले.
वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेला ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय)द्वारे राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे या स्पर्धेत प्रसिद्ध धावपटूंसोबत स्थानिक नागरिकही सहभागी होत असतात. यंदा मॅरेथॉन स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. ही स्पर्धा १ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी ९ सप्टेंबर २०२२ पासून ऑनलाईन नाव नोंदणी घेण्यास पालिकेच्या वतीने सुरुवात झाली आहे.