धारावीत ‘भारत जोडो’ समर्थनार्थ कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत ‘भारत जोडो’ समर्थनार्थ कार्यक्रम
धारावीत ‘भारत जोडो’ समर्थनार्थ कार्यक्रम

धारावीत ‘भारत जोडो’ समर्थनार्थ कार्यक्रम

sakal_logo
By

धारावी, ता. ५ (बातमीदार) : ‘भारत जोडो’ अभियानांतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी देशभरात पदयात्रा करत आहेत. दक्षिणेतून सुरू झालेली ही पदयात्रा महाराष्ट्रात पोहचली आहे. या पदयात्रेच्या समर्थनार्थ आज (ता. ५) धारावी विधानसभा काँग्रेसतर्फे पश्चिम द्रुतगती मार्गावरील धारावीतील टी जंक्शन येथे कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ व ‘भारत जोडो’ अभियानाला जाहीर पाठिंबा देणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमात धारावीतील काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.