वाहनाच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनाच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू
वाहनाच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ५ (बातमीदार) ः शीव-पनवेल महामार्गावर महाराष्ट्र नगर टी जंक्शनजवळ शुक्रवारी (ता. ४) रात्री अनोळखी व्यक्तीचा (अंदाजे वय ४० वर्षे) अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मानखुर्द पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्‍हीच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिस करत आहेत. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर टी जंक्शनपासून वाशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका नागरिकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्‍ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनचालकाने त्याला वैद्यकीय मदत तसेच पोलिसांना याविषयी न कळवता घटनास्थळावरून पळ काढला. यासंदर्भात माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवून दिला. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्याच्या नातेवार्इकांचा शोध तसेच अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध पोलिस घेत आहेत.