कॅलिफोर्नियात वसईच्या चित्रकाराची किमया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅलिफोर्नियात वसईच्या चित्रकाराची किमया
कॅलिफोर्नियात वसईच्या चित्रकाराची किमया

कॅलिफोर्नियात वसईच्या चित्रकाराची किमया

sakal_logo
By

प्रसाद जोशी, वसई
वसईतील अनेक कलाकारांनी सातासमुद्रापार आपली जादू दाखवली आहे, असेच एक चित्रकार श्रीहर्ष कुलकर्णी यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे डिजिटल आर्ट पेंटिंग प्रदर्शन भरवले. यात त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीला परदेशी नागरिकांनी दाद दिली.
बैलजोडी, शेतात जाताना शेतकरी, हनुमान, महादेवाची कथा श्रीहर्ष यांनी आपल्या कलेतून जिवंतपणे उभे केले आहे. या चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन अमेरिकेत राहणारे वैज्ञानिक डॉ. सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. वसई भास्कर आळी येथे श्रीहर्ष कुलकर्णी हे राहतात. मात्र आपल्या भारतीय परंपरेची माहिती ही परदेशातील नागरिकांना ज्ञात व्हावी म्हणून त्यांनी कॅलिफोर्नियात चित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला. याला अमेरिकेत राहणारे भारतीय व परदेशी नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद देत कुलकर्णी यांच्या चित्रांचे भरभरून कौतुक केले.
श्रीहर्ष हे व्यासंगी चित्रकार असून त्यांची चित्रे ही लक्षवेधी व आकर्षक आहेत. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून भावभावनांचे, वास्तवतेचे दर्शन प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांना घडत आहे. श्रीहर्ष यांनी आवड व कलेच्या आकर्षणामुळे चित्रकलेची जोपासना केली याचा मला अभिमान आहे, असे त्यांची पत्नी सरोज कुलकर्णी यांनी सांगितले.
---------------------------------------
संस्कृतीचे दर्शन
श्रीहर्ष यांनी कॅलिफोर्निया येथे भरवलेल्या डिजिटल आर्ट पेंटिंग प्रदर्शनात त्यांनी बैलजोडी, शेतात जाणारा शेतकरी अशा ग्रामीण भागातील जनजीवन तेथील रसिकांसमोर मांडले आहे; तर हनुमान, महादेवाची कथा अशा चित्रांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.
....
विविध विषयांना चित्रकलेतून रेखाटताना त्यांनी संस्कृती देखील रेखाटली आहे. त्यांच्या चित्रांतील कल्पकता व वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती वाखाणण्यासारखी आहे.
- डॉ. सतीश कुलकर्णी, वैज्ञानिक, अमेरिका
--------------------
वसई : चित्रकार श्रीहर्ष कुलकर्णी यांची कॅलिफोर्निया येथे प्रदर्शनात माडण्यात आलेली चित्रे.