फोटोग्राफर वेल्फेअर असोशिएशनतर्फे वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोग्राफर वेल्फेअर असोशिएशनतर्फे वृक्षारोपण
फोटोग्राफर वेल्फेअर असोशिएशनतर्फे वृक्षारोपण

फोटोग्राफर वेल्फेअर असोशिएशनतर्फे वृक्षारोपण

sakal_logo
By

भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : भिवंडी तालुका फोटोग्राफर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील दुगाडफाटा परिसरातील मालबिडी सूर्यानगर येथे सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण करून परिसरात खाऊवाटप तसेच माता भगिनींना दिवाळी भेट म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले. फोटोग्राफर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण तरे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तालुक्यातील सर्व छायाचित्रकारांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या उपक्रमामध्ये भिवंडी ग्रामीणचे उपाध्यक्ष शेखर भगत, सल्लागार राजेंद्र घैसास, सुधाकर गिध, भिवंडी शहर उपाध्यक्ष तिरुमल्लेश मंगलरप्पू, सचिव अनिल केणी, खजिनदार रवींद्र गुळवी, उपाध्यक्ष दीपक शेलार, उपाध्यक्ष सुभाष माघे, सहसचिव नागराज गाजुला, तुषार पाटील, मनोरम चेवसु, बाळाराम भोईर, सुधाकर गिध, तबरेज एदरिसी, प्रिन्स पाटील, मोहील भोईर, प्रकाश कांचिल, सुरेश कमुनी,‌ आशिष लाड, हर्षद निकम, किरण लखाद, प्रथमेश तिकोणे इत्यादी भिवंडी तालुका फोटोग्राफर वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.