भाताणे येथे विकास कामांचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाताणे येथे विकास कामांचा शुभारंभ
भाताणे येथे विकास कामांचा शुभारंभ

भाताणे येथे विकास कामांचा शुभारंभ

sakal_logo
By

वसई, ता. ५ (बातमीदार) : विरार भाताणे ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पंचायत समितीस्तर १५ व्या वित्त आयोगाकडून मंजूर निधीतून कामे केली जाणार आहेत. नवसई नदीवरील घाट परिसर सुशोभीकरण व पेव्हर ब्लॉक बसवणे यासाठी पाच लाख, तर पाचरुखे येथे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून तीन लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वसई पूर्व ग्रामीण विभागात अनेक कामे प्रस्तावित असून काही विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली. वसई पूर्वेकडील नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे राजेश पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य अशोक पाटील, भाताणे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच हितेश बाडगा, उपसरपंच हेमराज कासार, ग्रा. पं. सदस्य बबन नमकुडा, सदस्य योगेश कुडू, अश्विनी परेड, ग्रामविकास अधिकारी नितीन मोकाशी, संजय पाटील, प्रभाकर कासार, सुरेश कुडू, कृपेश पाटील, योगेश पाटील, मयुरेश कुडू यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
-----------------
वसई : भाताणे येथे विकासकामांचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.