बुद्धीबळ स्पर्धेत आयुष्य काबराची चमकदार कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धीबळ स्पर्धेत आयुष्य काबराची चमकदार कामगिरी
बुद्धीबळ स्पर्धेत आयुष्य काबराची चमकदार कामगिरी

बुद्धीबळ स्पर्धेत आयुष्य काबराची चमकदार कामगिरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : अमरावती येथे नुकत्याच झालेल्या १५ वर्षांखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याच्या आयुष काबरा याने उपविजेतेपद पटकावले. ही स्पर्धा अमरावती चेस अकॅडमी, अमरावती जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती. या स्पर्धेत नागपूरच्या सिद्धांत गवई याने विजेतेपद पटकावले; तर आयुष याने आठपैकी सात गुण मिळवून उपविजेतेपद मिळवले. यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील ११० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामधील ४४ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले होते. आयुषने ८ पैकी ६ डाव जिंकले आणि २ डाव बरोबरीत सोडविले. आयुष वाशी येथील अवोलोन हाईट्स शाळेत नववीत शिकत असून बुद्धिबळ प्रशिक्षक अभिजीत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत आहे. दिल्ली येथे २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या १५ वर्षांखालील मुलांच्या गटात आयुष महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.