Mumbai Bjp: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ‘जागर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp announces candidate for teachers constituency polls aurangabad
भाजपचा ‘जागर मुंबईचा’ आजपासून

Mumbai Bjp: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ‘जागर’

sakal_logo
By

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मुंबईत प्रचार मोहीम सुरू केली आहे. ‘जागर मुंबईचा’ हे अभियान रविवारपासून (ता.६) भाजपकडून सुरू करण्यात येणार आहे. वांद्रे येथून याची सुरुवात होईल. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे मुंबईत ३६ सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानाबाबत बोलताना भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशीष शेलार म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालिकेतील भ्रष्टाचार, परिवारवाद यांच्याविरोधात भाजपचा जागर सुरू होत आहे. याची सुरुवात वांद्रे येथून होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाची घोषणा करण्यात आली. या जागर यात्रेचे प्रमुख आमदार अतुल भातखळकर असणार आहेत. हे अभियान राजकीय भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, रविवारी वांद्रे येथील पीडब्ल्यूडी मैदानात संध्याकाळी ६ वाजता सभा होईल. या सभेला खासदार पुनम महाजन आणि आशीष शेलार संबोधित करतील.