मुले चोराच्या संशयातून तिघांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुले चोराच्या संशयातून तिघांना मारहाण
मुले चोराच्या संशयातून तिघांना मारहाण

मुले चोराच्या संशयातून तिघांना मारहाण

sakal_logo
By

पनवेल, ता. ५ (वार्ताहर) : मुले चोरण्यासाठी आल्याचे समजून तळोजा गावात राहणाऱ्या पाच ते सहा व्यक्तींनी रिक्षाचालक व दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याची घटना तळोजा येथे घडली. या मारहाणीत रिक्षाचालकाच्या रिक्षाचीदेखील तोडफोड केली आहे. या मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी सहा अज्ञात व्यक्तींविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

महम्मद गुलमोहम्मद शकील अन्सारी (वय २४) हा रिक्षाचालक शिळफाटा येथील झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासह राहावयास आहे. गुरुवारी (ता. ४) सकाळी मोहम्मद अन्सारी हा प्रवासी घेऊन कळंबोली येथे गेला होता. त्यानंतर तो दुपारी पुन्हा शिळफाटा येथे प्रवासी घेऊन जाण्यास निघाला होता. तळोजा गाव येथे दोन महिला प्रवाशांना सोडल्यानंतर त्याला शिळफाटा येथे राहणाऱ्या त्याच्या ओळखीतील दोन तरुणी निदर्शनास आल्या. त्यामुळे महम्मद अन्सारी हा त्या तरुणींकडे विचारपूस करत असतानाच त्यांच्या पाठीमागून आलेल्या चार ते पाच व्यक्तींनी सदर तरुणी मुले चोरण्यासाठी आल्याचे सांगत त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. अन्सारी याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी तोदेखील मुले चोरण्यासाठी आल्याचे सांगत त्यालादेखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.