रामचंद्र लेन मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामचंद्र लेन मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी
रामचंद्र लेन मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी

रामचंद्र लेन मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी

sakal_logo
By

मालाड, ता. ५ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील काचपाडा क्रमांक १ येथील रामचंद्र लेन या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. काचपाडा येथे जवळपास पाचशे घरांत अडीच ते तीन हजार लोकवस्ती वास्तव्य करत आहेत. या वस्तीलगत रामचंद्र लेन हा रस्ता आहे. येथून मोठ्या प्रमाणात एसव्ही रोड, मार्वे रोड, लिबर्टी गार्डन, लिंक रोड येथे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू असते. येथून वाहने वेगाने जात असल्‍याने अनेकदा अपघात झाले आहेत. या रस्त्यावर दुभाजक नसल्याने रस्ता ओलांडताना रहिवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी राष्ट्र सेवा दल, तसेच सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या वतीने पालिका सहाय्यक आयुक्तांकडे गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्‍यान, याबाबत लवकरच पी-उत्तर विभागीय पालिका सहाय्यक आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्र सेवादल अध्यक्षा आरोक्या मेरी शेट्टी, लक्ष्मी काऊंडर तसेच सफल विकास वेल्फेअर सोसायटीचे वरिष्ठ पदाधिकारी
कृष्णा वाघमारे व शशी गुप्ता यांनी सांगितले.