शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग
शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग

शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईकडे येणाऱ्या शालिमार-एलटीटी एक्स्प्रेसच्या पार्सल डब्यामध्ये नाशिक रोड रेल्वेस्थानकावर शनिवारी (ता. ५) अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर रेल्वेचे इंजिन पार्सल डब्यांपासून वेगळे करण्यात आले. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, रेल्वे डब्याचे मोठे नुकसान झाले असून मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना लेटमार्क लागलेला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १८०३० शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस मुंबईकडे येत होती. या दरम्यान नाशिक रोड येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर शालिमार एक्स्प्रेस थांबली असता सकाळी ८.४५ वाजता पार्सल डब्याला अचानक आग लागली. आगीची माहिती होताच रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम रेल्वेचे इंजिन लगेज डब्यांपासून वेगळे केले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती मध्ये रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. या घटनेची चौकशी मध्य रेल्वेच्या सेफ्टी विभागाकडून करण्यात येत आहे. शालिमार-एलटीटी एक्स्प्रेसच्या आग लागलेल्या पार्सल डब्यामध्ये इलेक्ट्रिक वस्तू, कपडे, वेगवेगळ्या बॅटरी व इतर समान होते. यातील अनेक समान जळून खाक झाले आहे.