बनावट कागदपत्रांतून ९६ लाखांचे कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट कागदपत्रांतून ९६ लाखांचे कर्ज
बनावट कागदपत्रांतून ९६ लाखांचे कर्ज

बनावट कागदपत्रांतून ९६ लाखांचे कर्ज

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर): प्लम्बिंगचे काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने खारघर सेक्टर-२७ भागात राहणाऱ्या एका प्लम्बरच्या कागदपत्रांवर स्वतःचा फोटो लावून विविध बँका व वित्तीय संस्थांकडून तब्बल ९६ लाखांचे कर्ज घेतले आहे. सचिन बिल्लूर असे व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीसह बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला आहे.
खारघर सेक्टर-२७ मधील रांजणपाडा येथे कुटुंबासह राहणारे नितीशकुमार प्रजापती (२७) प्लम्बिंगचे काम करतो. जून २०२० मध्ये नितीशकुमार यांची सचिन बिल्लूरशी कामानिमित्त भेट झाली होती. या ओळखीनंतर सचिन बिल्लूरने नितीशकुमारसोबत फोनवरून संपर्क ठेवत प्लम्बिंगचे काम मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत त्याचे आधार, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व इतर कागदपत्रे मागून घेतली होती. त्यामुळे काम मिळेल या आशेने नितीशकुमारने मार्च २०२१ मध्ये आपली कागदपत्रे सचिनच्या व्हॉट्सअॅपवर पाठवली होती. पण या कागदपत्रांचा गैरवापर करत सचिनने नितीशकुमारच्या आधार व पॅनकार्डवर स्वत:चा फोटो लावून बनावट आधार व पॅनकार्डाच्या आधारावर ७ वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढले. मात्र, मार्च २०२२ मध्ये डीसीबी बँकेने जेव्हा याबाबत नितीशकुमारशी संपर्क केला तेव्हा अधिक चौकशी केल्यानंतर जवळपास ९६ लाखांचे कर्ज घेतल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.