जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप परिसंवाद उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप परिसंवाद उत्साहात
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप परिसंवाद उत्साहात

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप परिसंवाद उत्साहात

sakal_logo
By

बोर्डी, ता. ६ (बातमीदार) : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप परिसंवादाला परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या परिसंवादात शंभर विद्यार्थी आणि शंभर पालकांनी सहभाग नोंदवला. खगोलशास्त्राविषयी सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडावी व विज्ञान युगात चाललेल्या घडामोडीची माहिती मिळावी म्हणून येथील हौशी खगोल शास्त्रज्ञ अथर्व पाटील यांनी हा परिसंवाद आयोजित केला होता. जगाच्या पाठीवरील वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या मोठमोठ्या दुर्बिणींविषयी अथर्व पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. भारताने अणू ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीबाबत गावातील विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी एक परिसंवाद आयोजित करण्यात यावा, अशी विनंती बोर्डी ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुहास पाटील यांनी यावेळी केली. मुंबई महापालिकेचे निवृत्त अधिकारी अतुल पाटील, एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक निनाद सावे, अजय पाटील, संदीप ठाकूर महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा राऊत आदी यावेळी उपस्थित होते.