विद्यादान सहाय्यक मंडळाच्या उपक्रमाला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यादान सहाय्यक मंडळाच्या उपक्रमाला प्रतिसाद
विद्यादान सहाय्यक मंडळाच्या उपक्रमाला प्रतिसाद

विद्यादान सहाय्यक मंडळाच्या उपक्रमाला प्रतिसाद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या विद्यादान सहायक मंडळाने गणेशोत्सव ते दिवाळी या उत्सव काळात निधी संकलनाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांना आवाहन केले होते. या आवाहनाला समाजातील विविध स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळाला असून ड्रॉफ केटल कंपनीचे संस्थापक आणि संचालक सुबोध मेनन यांनी भरीव देणगी दिली आहे.
दिवाळीनिमित्त प्रियजनांसोबत भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. या वर्षी सुबोध मेनन यांनी ही भेट अधिक अर्थपूर्ण असावी यासाठी वेगळा विचार केला. दीपावलीनिमित्त ग्राहक, विक्रेते, सरकारी अधिकारी इत्यादींना भेटवस्तू देण्यासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून त्यांनी विद्यादानला भरीव रक्कम दान दिली आणि एक उत्तम आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या देणगीतून अनेक विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण शैक्षणिक भेट मिळाली आहे. विद्यादान सहाय्यक मंडळ ठाणे ही स्वयंसेवी संस्था २००८ पासून शिक्षण क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच दुर्गम भागांतून येणाऱ्या गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीसोबतच भावनिक पाठिंबा, तसेच व्यावसायिक मार्गदर्शनाची मदत करीत आहे.