कल्याण पूर्वमध्ये परिसराचे सुशोभीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण पूर्वमध्ये परिसराचे सुशोभीकरण
कल्याण पूर्वमध्ये परिसराचे सुशोभीकरण

कल्याण पूर्वमध्ये परिसराचे सुशोभीकरण

sakal_logo
By

कल्याण, ता. ७ (बातमीदार) : कल्‍याण-डोंबिवली महापालिकेने सहयोग व सुप्रिया डोळ्यांचे हॉस्पिटल या सामाजिक संस्थेच्या मदतीने कल्याण पूर्वमधील गायत्री विद्यालय शाळेजवळ परिसर स्वच्छता करण्‍यात आली. नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तेथे सुंदर शिल्प बसविण्याचा कार्यक्रम पार पडला.
कल्याण पूर्वमध्ये चक्की नाका आणि गायत्री विद्यालय शाळेजवळ कचराकुंडी असताना परिसरात रोज कचरा साठत होता. मात्र, केडीएमसीचे घनकचरा विभाग उपायुक्त अतुल पाटील यांनी हा परिसर कचराकुंडी मुक्त करण्याचे ठरविले. शहराचे सौंदर्यीकरण या उपक्रमात सामाजिक संस्था, बांधकाम व्‍यावसायिक, कंपन्या यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांच्याद्वारे चौक, उद्यान, दुभाजक, शिल्प असे उपक्रम पलिकेने हाती घेतले असल्याचे सांगत सहयोग सामाजिक संस्थेने दोन ठिकाणी शिल्प उभारून शहराच्‍या सौंदर्यात भर घातल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.