वसईत मोफत आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत मोफत आरोग्य शिबीर
वसईत मोफत आरोग्य शिबीर

वसईत मोफत आरोग्य शिबीर

sakal_logo
By

वसई, ता. ६ (बातमीदार) : योग्यम हॉस्पिटलच्या सहकार्याने शिवसेना माजी उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वसई पश्चिम येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गुडघे, कंबर, मणका दुखी, अर्धांगवायू, मज्जासंस्थेचे विकार, तसेच ईसीजी, हाडाची तपासणी, मधुमेह आणि रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आली. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, वसई विधानसभा संघटक विनायक निकम, तालुका प्रमुख राजाराम बाबर, उपतालुका प्रमुख आनंद घरत, शहर प्रमुख संजय गुरव, प्रदीप सावंत उपस्थित होते. या शिबिरासाठी माजी विभाग प्रमुख उमेश शिखरे, शाखाप्रमुख गौरव घेवडे, महिला आघाडी शाखा संघटक विभा दुबे, शीतल सिंग, शर्मिला कोपर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.