मढ परिसरात सापांचा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मढ परिसरात सापांचा सुळसुळाट
मढ परिसरात सापांचा सुळसुळाट

मढ परिसरात सापांचा सुळसुळाट

sakal_logo
By

मालाड, ता. ६ (बातमीदार) ः मढ परिसरात मागील काही महिन्यांत अनेक विषारी-बिनविषारी साप आढळले आहेत. एरंगळ, मढ गाव, मढ बाजार, तसेच पासकल वाडी परिसरात सापांचे प्रमाण अधिक असल्‍याचे बोलले जात आहे.
दरम्‍यान, सुदैवाने या सापांनी कोणालाही दंश मारण्याच्या आधी परिसरातील सर्पमित्र रॉक्सन वेळोवेळी नागरिकांच्या मदतीला धावून आला व त्याने सापांना पकडले. यात घोणस, नाग, धामण, अजगर असे अनेक विषारी-बिनविषारी सापांचा समावेश आहे. याबाबत सर्पमित्र रॉक्सन यांनी माहिती दिली की, मढ बेट येथील जंगल तसेच हिरवळ हळूहळू नष्ट झाली आहे. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यात प्रमुख कारण म्हणजे परिसरात वाढता विकास. यासाठी वृक्षतोड झाली. त्‍ मुळे जंगलात किंवा हिरवळीत वास्तव्य करणारे साप त्यांच्या आसपास कोंबड्यांची अंडी व इतर खाण्याच्या वस्तूंच्या शोधात बाहेर पडत आहेत. त्‍यामुळे वस्त्यांमध्‍ये सापांचे प्रमाण वाढले आहे.