सुलोचना शेट्टी मार्गावर कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुलोचना शेट्टी मार्गावर कचरा
सुलोचना शेट्टी मार्गावर कचरा

सुलोचना शेट्टी मार्गावर कचरा

sakal_logo
By

धारावी, ता. ६ (बातमीदार) : लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयाकडून धारावीच्या दिशेने येणाऱ्या सुलोचना शेट्टी मार्गावर कचरा पडून असल्याने पादचारी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सुलोचना शेट्टी मार्ग हा धारावीतील ६० फुटी संत कबीर मार्गाला जोडला जातो. धारावीतील अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक धारावीतून सायन रुग्णालयात जाण्यासाठी व येण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. तसेच शीव हिंदू स्मशानभूमी, तसेच ख्रिस्ती स्मशानभूमीत शालिनी भवन येथे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. यामुळे अनेक जण पायी या ठिकाणी जाणे पसंद करतात. या रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत असल्याने धारावीतील रहिवासी पायी जातात.
गेले काही दिवसांपासून रस्त्यावर जागोजागी कचरा पडल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरून जाताना कचऱ्याची दुर्गंधी सहन करावी लागते. रस्त्यावरून मुंबईच्या दिशेकडून येणाऱ्या वाहनांना चुकवावे की रस्त्यातच पडलेल्या कचऱ्याला, असा प्रश्न पादचाऱ्यांना पडत आहे. यामुळे पादचारी संताप व्यक्त करत आहेत.