गटाराच्‍या झाकणाची दुरवस्‍था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गटाराच्‍या झाकणाची दुरवस्‍था
गटाराच्‍या झाकणाची दुरवस्‍था

गटाराच्‍या झाकणाची दुरवस्‍था

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. ६ (बातमीदार) ः जोगेश्‍वरी पूर्वेतील ट्रामा केअरसमोरील वेस्‍टर्न एक्‍स्‍प्रेस-वेच्‍या पुलाखालील भू‍मिगत असलेल्या गटाराच्‍या झाकणांची दुरवस्‍था झाली आहे. पोलिसांनी येथील नागरिकांच्‍या सुरक्षितेसाठी तुटलेले बॅरिकेटस त्‍यावर ठेवले आहे. दरम्‍यान, रस्त्याच्‍या मधोमधच ड्रेनेजचे झाकण खचल्‍याने अपघाताचा धोका वाढला आहे. खचलेल्‍या झाकणा शेजारील इतर झाकणांची व आजूबाजूच्‍या परिसर व रस्‍त्‍याची दुरुस्‍ती होणे जरुरीचे आहे. या मार्गावरून जोगेश्‍वरी विक्रोळी रिंग रोडवरील या मार्गावर दिवस-रात्र लाखो लहान-मोठी, तसेच अवजड वाहने या रस्त्यावर जात-येत असल्‍याने पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने रात्री हा धोका अधिकच वाढतो. अपघाताची वाट न पाहता महापालिकेने व रस्‍ते विभागाने त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील वाहनधारक व नागरिक करत आहेत.