भात खरेदी केंद्रास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त तिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात खरेदी केंद्रास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त तिसाद
भात खरेदी केंद्रास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त तिसाद

भात खरेदी केंद्रास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त तिसाद

sakal_logo
By

पडघा, ता. ६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथील शासनाकडून मंजुरी मिळालेल्या शेतकरी सहकारी भातगिरणी या संस्थेच्या भात खरेदी केंद्रास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पडघा परिसरातील गावांतील भात उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय असून भात हंगामानंतर शेतकऱ्यांना भात विकण्यासाठी तालुक्यातील दूरवरच्या खरेदी केंद्रावर जावे लागत होते, ही बाब लक्षात घेऊन शेतकरी सहकारी भातगिरणीचे सभापती दत्तात्रेय पाटोळे, उपसभापती मनोहर ठाकरे, व्यवस्थापिका शीतल कशिवले व संचालक मंडळाने प्रयत्न करून आधारभूत भात खरेदी केंद्रास शासनाकडून मंजुरी घेऊन नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नाव नोंदणीस १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून आपले भात विक्रीसाठी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन भातगिरणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी तालुक्यातील कुठल्याही खरेदी केंद्रावर नोंदणी केली असली तरी त्यांना पडघा येथील भात खरेदी केंद्रावर भात विकता येईल, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.