माळरान खुरासनीने फुलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळरान खुरासनीने फुलला
माळरान खुरासनीने फुलला

माळरान खुरासनीने फुलला

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ६ (बातमीदार) : विक्रमगड, जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात माळरान, डोंगर पठारावर शेतकरी खुरासनीच्या पिकांची लागवड करतात. दिवाळीनंतर या पिकाल फुलोरा येतो. त्यामुळे डोंगर, पठारे खुरासनीच्या फुलांनी बहरली आहेत. या फुलांचा सर्वत्र सुवास दरवळला आहे. या खुरसनीच्या बियांपासून तेल काढले जाते. खुरसनीच्या तेलाचा उपयोग आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच हाता-पायाला सूज आल्यास मालीश करण्यासाठी या तेलाचा उपयोग केला जातो.