महापे गावातून दीड लाखांचा गुटखासाठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापे गावातून दीड लाखांचा गुटखासाठा जप्त
महापे गावातून दीड लाखांचा गुटखासाठा जप्त

महापे गावातून दीड लाखांचा गुटखासाठा जप्त

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने महापे गावातील एका घरावर छापा मारून १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला. या कारवाईत गुटख्याचा साठा करणारा संतोष प्रभू साव (वय ३२) याच्याविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. महापे गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या घरामध्ये गुटख्याचा साठा करून त्याची किरकोळ विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सय्यद यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक शिंगे व त्यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी महापे गावातील भगवान पाटील चाळीतील संशयित घराजवळ जात असताना, पोलिसांना पाहून गुटख्याचा साठा करणारा संतोष साव हा पळून गेला. पथकाने घरात जाऊन पाहणी केली असता, गोण्यांमध्ये एकूण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला.